केंद्र शासनाच्या चुकीच्या औषधी धोरणामुळे विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तसेच नफ्यात देखील कमतरता आल्यामुळे औषध विक्रेत्यांच्या संघटनेने उद्या, शुक्रवारी देशव्यापी संप पुकारल्यामुळे विदर्भातील औषधांची सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या बंदमध्ये भारतातील साडेसात लाख औषध विक्रेते संपात सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिल्लीमध्ये जंतरमंतरवर धरणे प्रदर्शन होईल. बंदमध्ये विदर्भातील औषध विक्रेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नागपूर झोनचे अध्यक्ष मुकुंद दुबे यांनी केले.
औषध विक्रेत्यांचा उद्या बंद असला तरी नागपूर जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने अत्यावश्यक सेवा म्हणून गांधीबागमधील केमिस्ट भवनमध्य़े व्यवस्था केली आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी ०७१२- २७७६५२४ आणि ०७१२-२७३४२६१, ९८५०३१२३१९, ९८९०१८२०४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असोसिएशनने कळविले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 4:08 am