News Flash

महिलेचे गंठण पळविणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

सिग्नलला थांबलेल्या स्कुटीवरील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघा भामटय़ांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची आधी पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन

| February 14, 2013 12:37 pm

सिग्नलला थांबलेल्या स्कुटीवरील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघा भामटय़ांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची आधी पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अशोक हॉटेल चौकात गेल्या ३१ जानेवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास सीमा अयाचित आपल्या मैत्रिणीच्या स्कुटीवर जात होत्या. रहदारीच्या अशोक हॉटेल चौकात सिग्नल लागल्याने त्या थांबल्या असता एमएच ३३१० क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केला.
पोलीस उपनिरीक्षक सुजाता शानमे यांनी या घटनेचा तपास केला. त्यांनी एका लॉजवरून पवन भवानीप्रसाद व्यास (वय २६, भालकी)  दि. १ फेब्रुवारीला, तर प्रभाकर मनोहर कानेगावे (वय ३२, चरणनगर, तालुका भालकी) यास १० फेब्रुवारीला अटक केली.
चोरीत वापरलेली मोटरसायकल व गंठण त्यांच्याकडून जप्त केले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी, तर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:37 pm

Web Title: court custody to two robbers
Next Stories
1 गणवेशप्रकरणी मनसेचा आंदोलनाचा इशारा
2 आठवडय़ातून केवळ ४० मिनिटेच मिळते पाणी!
3 आश्वासनांचा पाऊस; ठोस निर्णय मात्र नाही!
Just Now!
X