01 October 2020

News Flash

गोग्रासवाडीत मार्गावरील रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण

डोंबिवली पूर्वेतून गोग्रासवाडीत सरोवर हॉटेलपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत रिक्षा संघटनांनी ठरवून दिलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडे आकारणीस फाटा दिल्याने या मार्गावरील

| November 16, 2012 03:25 am

डोंबिवली पूर्वेतून गोग्रासवाडीत सरोवर हॉटेलपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत रिक्षा संघटनांनी ठरवून दिलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडे आकारणीस फाटा दिल्याने या मार्गावरील प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
या भागातील रिक्षा संघटनांनी भाडेवाढीला फाटा देत प्रवाशांना सोयीस्कर असे सवलतीचे भाडे कायम केले. मात्र सवलतीचा हा भाडेदर रिक्षा चालकांना मान्य नाही. त्यामुळे रिक्षा संघटनांनी ठरविलेला सवलतीचा भाडेदर पत्रक धाब्यावर बसविले जात आहे. याप्रकरणी अनेक प्रवासी दररोज रिक्षा चालकांशी वाद, हुज्जत घालत आहेत.  काही प्रामाणिक रिक्षा चालक डोंबिवली पूर्व ते गोग्रासवाडी सरोसवर हॉटेलपर्यंत रिक्षा संघटनांनी केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे भाडेवाढ   आकारणे आवश्यक आहे, असे मत मांडत आहेत.   के. व्ही. पेंढरकर कॉलेजपर्यंत २.१ किलोमीटरच्या अंतरापर्यंत आरटीओचा प्रवाशामागे दर १२ रूपये आहे. रिक्षा संघटनांच्या पुढाकारानंतर हा दर कमी केला गेला.  त्यानुसार  पाथर्ली नाका ८ रूपये, घरडा सर्कल ९ रूपये व पेंढरकर कॉलेज १० रूपये असा झाला. डोंबिवली पूर्व ते गोग्रासवाडी सरोवर हॉटेलपर्यंत   रिक्षा संघटनांनी टप्प्याप्रमाणे ८ रूपये, ९ रूपये व १० रूपये प्रमाणे भाडे आकारणे आवश्यक असताना गोग्रोसवाडीतील रिक्षा चालक प्रवाशांकडून कोणतीही दरवाढ कमी न करता १०, ११ व १२ रूपये   आकारत आहेत. हे अन्यायकारक आहे, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2012 3:25 am

Web Title: coustmers get wildness treatment by gograsvadi rickshaw drivers
टॅग Rickshaw,Transport
Next Stories
1 कचऱ्यातील स्फोटाने भिवंडीत पाच जखमी
2 जल्लोषाची दिवाळी पहाट
3 दिवाळी पाडवा : हळुवार नात्याची दृढ जपणूक
Just Now!
X