News Flash

भारतीय ज्ञान विज्ञानात शिल्पशास्त्राचे मोलाचे योगदान -प्रा. नेने

पृथ्वीवर मनुष्य जन्माला आला तेव्हापासून शिल्प अस्तित्वात आले. शिल्प या संस्कृत शब्दाला फार व्यापक असा अर्थ आहे. शिल्प म्हणजे दु:ख निवारण करणे तसेच या जगातील

| March 14, 2013 03:17 am

पृथ्वीवर मनुष्य जन्माला आला तेव्हापासून शिल्प अस्तित्वात आले. शिल्प या संस्कृत शब्दाला फार व्यापक असा अर्थ आहे. शिल्प म्हणजे दु:ख निवारण करणे तसेच या जगातील वस्तू उपयोगात आणण्यायोग्य करणे होय, पण आज भारतीय शिल्पशास्त्राला धर्म व वास्तुशास्त्राला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित केले आहे. शिल्पशास्त्राचे भारतीय ज्ञान विज्ञानात मोलाचे योगदान असल्याचे मत प्रा. अशोक नेने यांनी व्यक्त केले.
गोरक्षण सभेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त भारतीय ज्ञान-विज्ञानावर आयोजित दिवंगत मोरोपंत पिंगळे व्याख्यानमालेचे आयोजन गोरक्षण सभेच्या गोपालकृष्ण मंदिरात करण्यात आले. या व्याख्यान मालेतील चवथे पुष्प गुंफताना प्रा. अशोक नेने यांनी प्राचीन भारतीय कृषी विद्या या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शिल्प शास्त्रामध्ये सुतार काम, गवंडी काम, लोखंडी काम, रंग बनविणे, मूर्तीकला, चित्रकला, मंदिरे आदींचा समावेश होतो. शिल्पशास्त्र हे प्राचीन आहे. वृक्ष आयुर्वेद हा ग्रंथ एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. कृषी पाराशर हा कृषी विषयावरील जगातील पहिला ग्रंथ कृषी ज्योतिष वर्णन व जमिनीखालील पाण्याच्या शोधावर आधारित आहे. वृक्षवल्लव या ग्रंथात पाणी अडवा पाणी जिरवा व किल्ल्यांवर कुठली झाडे हवी, याबाबतचे ज्ञान आहे. प्राचीन भारतीय वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासातून विविध प्रकारच्या वृक्षांची माहिती मिळू शकते. या विषयाच्या अभ्यासाचा फायदा इंजिनिअर्स व आर्किटेक्ट्सना होऊ शकतो. शिल्पशास्त्रात विज्ञानच नव्हे तर तत्त्वज्ञानही आहे. वनस्पती शास्त्र विषयातही संशोधकांना संशोधनासाठी वाव असल्याचे प्रा. नेणे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रसन्न मुजुमदार यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:17 am

Web Title: craft science contribution is very important in indian science prof nene
टॅग : Science 2
Next Stories
1 नव्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय कसोटी लागणार!
2 आमगाव तालुक्यात पोवारीटोला घाटावरील वाळूचा साठा जप्त
3 ‘अल्ट्राटेक’ विरोधात नांदाफाटात उपोषण सुरूच
Just Now!
X