23 February 2019

News Flash

बारावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी दोघा पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल

बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला कॉपी आढळून आल्याने त्याची जबाबदारी संबंधित दोघा पर्यवेक्षकांवर निश्चित करून त्यांच्याविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे हा

| February 24, 2014 03:30 am

बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला कॉपी आढळून आल्याने त्याची जबाबदारी संबंधित दोघा पर्यवेक्षकांवर निश्चित करून त्यांच्याविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे हा प्रकार घडला. एम. एल. थोरात व पी. आर. धोत्रे अशी त्यांची नावे आहेत.
मंद्रूपच्या लोकसेवा विद्यामंदिर येथील परीक्षा केंद्रात दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अधिपत्याखालील कॉपीविरोधी पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली असता ४९ कॉपी आढळून आल्या. याठिकाणी थोरात व धोत्रे हे दोघे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कानावर घातली असता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पर्यवेक्षक थोरात व धोत्रे यांच्याविरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published on February 24, 2014 3:30 am

Web Title: crime regisater against 2 observer in hsc copy case