22 September 2020

News Flash

आमदार बोर्डीकरांवर गुन्हा दाखल

मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

| January 20, 2014 02:25 am

मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वीज कंपनीच्या विरोधात आमदार बोर्डीकरांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. येथील शिवाजी पुतळय़ाजवळील मदानावर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. या वेळी महिला पोलीस बंदोबस्ताला असताना आमदार बोर्डीकरांनी अश्लील भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली. भाषणादरम्यान अश्लील भाषेचा वापर केला तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार जमादार सय्यद जाफर सय्यद महेबूब यांनी रविवारी नवा मोंढा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी आमदार बोर्डीकरांविरुद्ध कलम २९४, ५०४ आणि ५०६ या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फारुखी करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2014 2:25 am

Web Title: crime registered against mla bordikar
Next Stories
1 पोलिसांच्या गाफीलपणाबाबत नाराजी
2 पैनगंगा भूसंपादन घोटाळय़ातील अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे नव्याने निर्देश
3 जालना, हिंगोलीत अवकाळी पाऊस
Just Now!
X