News Flash

महिलेचा विनयभंगाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा

छायाचित्र काढण्यासाठी दुकानात आलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते फारूख कमिशनर यांच्यासह दोघाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

| July 2, 2013 01:48 am

छायाचित्र काढण्यासाठी दुकानात आलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते फारूख कमिशनर यांच्यासह दोघाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयासमोर व्यापारसंकुलातील छायाचित्र दुकानात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. कमिशनर यांना लगेचच अटक करण्यात आली नाही.
भवानी पेठेत राहणारी एक विवाहित तरुणी न्यायालयीन कामासाठी न्यायालय परिसरात आली होती. तिला तातडीने स्वत:चे छायाचित्र काढून द्यायवायचे असल्याने तिने सदर छायाचित्र दुकानात प्रवेश केला. छायाचित्र काढताना फारूख कमिशनर यांनी तिचा विनयभंग केला. त्यावेळी लज्जेखातर तिने संयम पाळला असता पुन्हा तिच्याशी लज्जास्पद वर्तन करण्यात आल्याने सदर विवाहितेने स्वत:च्या बचावासाठी आरडाओरडा केला. त्यावेळी त्याठिकाणी गर्दी झाली. त्याचवेळी कमिशनर व अल्ताफ जमादार यांनी तिला दमदाटी व शिवीगाळ केली. जेलरोड पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. पोलीस येईपर्यंत कमिशनर तेथून गायब झाल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:48 am

Web Title: crime registered on congress activist for womens molestation
Next Stories
1 लौकिकाची घडी विस्कटण्याचा धोका!
2 शेतीच्या ६ आवर्तनांबाबत साशंकता व्यक्त
3 व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने लांबविले; मोलकरणींवर संशय
Just Now!
X