लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील ११० गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस दलाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. यात कॉंग्रेसचे नगरसेवक करीमलाला काजी व शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात गुरुवार, १० एप्रिललीमतदान होत आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी व जिल्हा पोलिस दलाने सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणुकीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा दंगा किंवा अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्ह्य़ातील ११० गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींचे तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस दलाने संबंधित उपविभागीय अधिकारी व जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. यात तडीपारीच्या ४० जुन्या प्रकरणांचा, तर ७० नवीन प्रकरणांचा समावेश आहे. त्यातही चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.राजू भुजबळ यांनी चंद्रपूर उपविभागातील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. यात कॉंग्रेसचे नगरसेवक करीमुद्दीन करीमलाला शिराजुद्दीन काझी व शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांचा समावेश आहे.
अन्य गुन्हेगारांमध्ये घुग्घुस येथील तिरुपती पॉल हत्याकांडातील शेख हाजी शेख सरवर या सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे, तसेच कमलेश बनसोड, गणेश पडोळे, सोनु गोगुलवार, रामतुफान यादव, चेतन खुटेमाटे, सिन्नू उर्फ श्रीनिवास गोसाला, गणेश ढेकलेवाले, प्रवीण उर्फ टिल्ल्या वासेकर, शैलेश बंडावार, आकाश पोनाला, गणेश आत्राम, लालपेठ कॉलरी, शेख शाबीर शेख नजीर, चंद्रपूर, ललीत कंजर, जलनगर, दासा उर्फ दशरथ इटनकर, ऊर्जानगर, करीमुद्दीन करीमलाला शिराजुद्दीन काजी, जग्गा उर्फ जगराखण बिंदे, सिन्नू उर्फ श्रीनिवास आवला, संतोष रामटेके, सुरेश उर्फ ढाढय़ा सोनवणे, रविश सिंह, घुग्घुस, श्रीकांत उर्फ लढ्ढा नुन्ने, घुग्घुस, रवी उर्फ अण्णाकुमार सूरमवार, बल्लारपूर, आकाश उर्फ चिन्ना अंदेवार, प्रतीक उर्फ राहुल झाडे, महाकाली वार्ड, अरविंद उरकुडे, राजू कोपेलवार, राहुल आरमुल्ला, पप्पु उर्फ सुमीत कंजर यांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी, भद्रावती, बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती तालुक्यातीलही अनेक गुन्हेगारांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात या सर्वाची धरपकड करून त्यांना बाहेर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.