News Flash

ग्राहकांना स्वस्त व उत्कृष्ट मोसंबी मिळणार

नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नागपूरकरांना स्वस्त व उत्कृष्ट मोसंबी देण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने मोसंबीचा पहिला ट्रक नागपुरात आणला जाणार आहे.

| September 6, 2014 02:07 am

नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नागपूरकरांना स्वस्त व उत्कृष्ट मोसंबी देण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने मोसंबीचा पहिला ट्रक नागपुरात आणला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता कृषी महाविद्यालय परिसरात (महाराजबाग) होणार आहे.
याप्रसंगी विभागीय कृषी संचालक डॉ. घावटे, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य गोंगे, माजी आमदार सुनील शिंदे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
शेतात उत्पादित झालेली फळे, भाजीपाला बाजारात न विकता थेट ग्राहकांपर्यत न्यावा. त्यांना माफक दरात ताजी व उत्कृष्ट दर्जाची फळे व भाजीपाला मिळावा, या हेतूने नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ‘नरखेड तालुका फळे, भाजीपाला व धान्य उत्पादक सहकारी संस्था’ स्थापन केली.
या संस्थेमार्फत कारंजा येथील संत्रा पॅकिंग सेंटर चालवण्याचे ठरवण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मोठय़ा संत्र्याला योग्य भाव मिळावा यासाठी निर्यात करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रक्रियेत शेतातील निघालेली मोसंबी थेट ग्राहकांच्या हाती स्वस्त दरात पडणार आहे. तसेच उत्कृष्ट दर्जा असलेली मिळणार आहे. विक्रीच्या दृष्टीने शहरातील पंधरा ठिकाणी केंद्र ठरवण्यात आले आहे. या विक्री केंद्रावर मोबाईल व्हॅनद्वारे मोसंबी उपलब्ध करून दिली जाईल. प्रतिसाद मिळताच शहरात अन्य ठिकाणी विक्री केंद्र उघडण्यात येईल. याचा ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
काटोल येथील कारखाना लिजवर घेऊन तेथे मोसंबी व संत्र्यापासून ज्यूस आणि वाईन तयार करण्याची योजना असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वैभव दळवी, बाळ ठाकरे, राजू महंत, चंद्रकांत भुयार उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:07 am

Web Title: customers get cheap and super citrus
Next Stories
1 जनसहभागामुळेच विकासकामांना गती देऊ शकलो – अनिल सोले
2 अनेक रुग्णालयांमध्ये गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी
3 क्रांतीकारक स्मृती संवर्धन संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गणशोत्सव
Just Now!
X