News Flash

डबिंग तंत्रज्ञानाची नगरला कार्यशाळा

चित्रपट क्षेत्रातील डबिंग (संवाद ध्वनिमुद्रण) या तंत्रज्ञानाची कार्यशाळा नगरमध्ये २२ एप्रिल ते १ मे दरम्यान होत आहे. नगरमध्ये प्रथमच अशा स्वरूपाची कार्यशाळा होणार आहे. निषाद क्रिएशन

| April 3, 2013 01:00 am

चित्रपट क्षेत्रातील डबिंग (संवाद ध्वनिमुद्रण) या तंत्रज्ञानाची कार्यशाळा नगरमध्ये २२ एप्रिल ते १ मे दरम्यान होत आहे. नगरमध्ये प्रथमच अशा स्वरूपाची कार्यशाळा होणार आहे.
निषाद क्रिएशन अँड इव्हेन्टस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील ए. के. स्टुडिओ यांनी त्यांना सहकार्य केले आहे. या क्षेत्रातील तज्ञ केदार आठवले या कार्यशाळेत चित्रपट, जाहिरातपट, व्यंगचित्रपट तसेच विविध भाषांमधील चित्रपट यासाठीचे डबिंग, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे डबिंग याची सविस्तर माहिती देणार आहेत.
न्यू आर्टस महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन विभागाच्या साहाय्याने आयोजित कार्यशाळेत एका तुकडीत १२ विद्यार्थ्यांचा समावेश व २ तासांचा वर्ग अशी रचना आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मानसी भणगे (९९२२४१९३०६) व प्रसाद भणगे
( ९२२५३१६६१५) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:00 am

Web Title: dabbing technology workshop in nagar
टॅग : Technology
Next Stories
1 कोल्हापुरात व्यापार बंदला मोठा प्रतिसाद
2 मुख्यमंत्री व पत्रकारांमध्ये प्रशासनाची आडकाठी
3 काशिनाथचं चांगभलं’च्या गजरात बावधनचे बगाड साजरे
Just Now!
X