News Flash

दालन २०१३’मध्ये उमटले नव्या करवीरनगरीचे प्रतििबब

कोल्हापुरातील प्राचिन वास्तुकलेचे वैभव शब्दातीत आहे. काळानुरूप करवीर नगरीचा विकास होत गेला आणि कालसुसंगत अशा इमारती आकाराला येऊ लागल्या. त्यामधील नावीन्य, कलात्मकता व रचना या

| January 17, 2013 08:19 am

कोल्हापुरातील प्राचिन वास्तुकलेचे वैभव शब्दातीत आहे. काळानुरूप करवीर नगरीचा विकास होत गेला आणि कालसुसंगत अशा इमारती आकाराला येऊ लागल्या. त्यामधील नावीन्य, कलात्मकता व रचना या वाखाण्यासारख्या आहेत. आता तर या नगरीत ११ मजली इमारत बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने इथल्या वास्तूंना आणखीन चांगले रंगरूप येणार आहे. याची चुणूकच ‘क्रेडाई’च्यावतीने कोल्हापूरमध्ये भरणाऱ्या ‘दालन २०१३’ या प्रदर्शनात पहावयाला मिळणार आहे. वैशिष्टय़ म्हणजे यंदा क्रेडाई रौप्यमहोत्सव साजरा करीत असतांना या संघटनेची तसेच कोल्हापुरातील वास्तूपरंपरेचा आढावा घेतांना अनेक वैशिष्ठय़पूर्ण घटनांची मालिकाच नजरेसमोर तरळू लागते.     
बदलत्या काळाबरोबर उद्योग, व्यवसाय, पर्यटन, सहकार, साहित्य, कला, शिक्षण यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये कोल्हापूरने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि लोकांचे रहाणीमान देखील उंचाविण्यास सुरूवात झाली. जशी जागेला किंमत आली, जागा कमी पडू लागली व विभक्त कुटुंब पध्दती रूजू लागली तशी मुंबई-पुण्यासारखी अपार्टमेंटची कल्पना प्रत्यक्षात येणे आपल्याकडे अपरिहार्य झाले. त्यामुळेच कोल्हापुरात १९८५ सालापासून खऱ्याअर्थाने अपार्टमेंट संस्कृती सुरू झाली. पण खरे सांगायचे झाले तर अजूनही कोल्हापूरकर स्वतंत्र घराच्या प्रेमात आहेत. पण ते आता खूप कठीण व कष्टाचे झालेले आहे.या अपार्टमेंट संस्कृतीच्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांची एक संघटना असणे हे क्रमप्राप्त झाले व त्यातूनच पूर्वाश्रमीची प्रमोटर्स अँन्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर (पीबीएके) व आताची क्रेडाई-कोल्हापूर यांची स्थापना १९८९ रोजी केवळ १९ बांधकाम व्यावसायिकांनी मिळून केली. आज मात्र २५ वर्षांत पदार्पण करणारी ही संघटना कोल्हापूरच्या जडणघडणीतील व स्थित्यंतरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच क्रेडाई संस्थेने गेल्या २५ वर्षांत अनेक सामाजिक व बांधकाम उपयोगी उपक्रम शहरात राबविले. त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्यात बांधकाम विषयक जागृती होण्यासाठी दालन प्रदर्शन हे बांधकाम विषयक प्रदर्शनाची प्रथा चालू केली.    
केड्राई-कोल्हापूर (पीबीएके) च्या सभासदांनी १९९२ साली पहिले बांधकाम विषयक प्रदर्शन प्रायव्हेट हायस्कूल ग्राऊंडवर भरविले. त्यावेळी लोकांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर दर तीन वर्षांनी केड्राई हे अखंडपणे प्रदर्शने भरवित आलेली आहे. नंतर १९९५, १९९८ ही दालन प्रदर्शने प्रायव्हेट हायस्कूल ग्राऊंडवर अंदाजे ६० ते ६५ स्टॉल्स् या संख्येने भरवली होती. त्यानंतर मात्र बांधकाम व्यवसायात आलेली भरभराट व वाढत्या नागरीकरणामुळे २००१ ते २०१३ ही पाच दालने शाहूपुरी जिमखाना या भव्य क्रीडांगणावर अंदाजे १२५ ते १५० या स्टॉल्स संख्येने उभी करण्यात आली. या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्टय़े म्हणजे यात नेटकं नियोजन, भव्य प्रवेशव्दार, उदंड प्रतिसाद, मान्यवर राजकीय दिग्गजांकडून उद्घाटन,शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगता समारंभ, टेक्निकल सेमिनार, बांधकामातील सर्व घटकांचा समावेश ही असून त्यामुळेच त्याची भव्यता लोकांना दिसून येते.बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांच्या नवीन प्रकल्पाची सुरूवातच या ‘दालन’ मधून होत असते. शहराच्या विकासात मोठे पाऊल ठरलेले हे नवनवीन बांधकाम प्रकल्प पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण हे बांधकाम व्यावसायिकांचे आकर्षक व भव्य रहिवासी व व्यापारी प्रकल्प आहे. गृहबांधणी क्षेत्रात गृहकर्ज देण्याकरीता आता एचडीएफसी हौसिंग, एलआयसी हौसिंग, गृहफायनान्स या फायनान्स कंपन्यांबरोबर सहकारी व खासगी बँकादेखील जोमाने उतरल्या आहेत. आता त्याच्या स्पर्धेला एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सीस, आयडीबीआयसारख्या बँकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रदर्शन कालावधीत प्रोसेसिंग फी किंवा व्याजदरात भरीव सूट देखील या वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था देत असतात व त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत असतो.     
सन १९९२ पासून संस्थेचे माजी अध्यक्ष राम पुरोहित, व्ही.बी.पाटील, बाळ पाटणकर व संजीव कुलकर्णी यांनी पाडलेली प्रदर्शनाची प्रथा व नेटके नियोजन तसेच भव्यता यामुळे हे प्रदर्शन कायमस्वरूपी कोल्हापूरकरांच्या मनात घर करून बसले आहे. लोक हे प्रदर्शन येण्याची वाट पाहत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 8:19 am

Web Title: dalan 2013 property and construction exhibition from today in kolhapur
टॅग : Exhibition
Next Stories
1 अरुणा आदोने यांचे निधन
2 शल्यचिकित्साशास्त्र विभागाची उद्यापासून परिषद
3 दलितवस्ती सुधार योजनेत ‘तांबवे’ला द्वितीय क्रमांक
Just Now!
X