दलित समाजात नेतृत्वासाठी दररोज जणू काही स्पर्धाच निर्माण झाली असल्याने स्वार्थी राजकारणामुळे दलित समाज दिशाहीन होत चालला आहे.
या समाजास दिशा दाखविण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती केली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत, अशी ग्वाही रिपब्लिकन सेनेचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
आंबेडकर हे इगतपुरी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ ठेवून रिपब्लिकन सेनेची निर्मिती झाली नसल्याचे स्पष्ट केले.
केवळ समाज संघटित करून समाजाला न्याय हक्क मिळवून देणे हा एकमेव उद्देश असल्याचे ते म्हणाले. इंदू मिलच्या जागेसाठी दलित सैनिकांनी लढा दिल्याने राज्य सरकारला नमते घ्यावे लागले.
परिणामी इंदू मिलची साडेचार एकर जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मिळाली.
हे स्मारक जगातील महत्त्वपूर्ण स्मारक ठरेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मनोहर रुपवते, प्रकाश बागूल, भिकाभाऊ गांगुर्डे आदी उपस्थित होते.