30 October 2020

News Flash

दर्याच्या महाकाय लाटा..

समुद्राच्या भरतीने रौद्ररूप धारण केल्याने किनाऱ्यावर चार ते पाच मीटर उंचीच्या लाटांचा मारा सुरू झाला असून, मागील दोन दिवसांपासून उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यालाही या महाकाय

| June 14, 2014 07:16 am

समुद्राच्या भरतीने रौद्ररूप धारण केल्याने किनाऱ्यावर चार ते पाच मीटर उंचीच्या लाटांचा मारा सुरू झाला असून, मागील दोन दिवसांपासून उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यालाही या महाकाय लाटांनी धडका दिल्या असून, शुक्रवारी आलेल्या चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटांमुळे उरणमधील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यासह करंजा बंदराचेही नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे समुद्राच्या लाटा अंगावर झेलण्यासाठी पिरवाडी किनाऱ्यावर उरणकरांनी गर्दी केली होती. निसर्गाचा प्रकोप काय असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुरुवारी मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी समुद्राचे रस्त्यावर आलेले पाणी. त्याचीच पुनरावृत्ती अनेक ठिकाणी झालेली असून, उरणसारख्या समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेला मातीचा भराव, तसेच उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेले नैसर्गिक स्रोत उद्ध्वस्त करण्याची मोहीम, यामुळे अनेकदा उरण तालुक्यातील अनेक गावांत समुद्राच्या भरतीच्या वेळी पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झालेली आहे. शुक्रवारी आलेल्या भरतीच्या वेळी पाऊस नसल्याने भरतीचा जोर कमी होता, त्यामुळे गावांत पाणी शिरले नाही. मात्र पावसाळ्यात हा धोका संभवतो, दरम्यान शुक्रवारी उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत होत्या. त्यामुळे चार ते पाच फुटांवर ही लाट किनाऱ्यावर उंची गाठीत होती. या लाटांमुळे किनाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. करंजा बंदराचेही नुकसान झाले असून, येथील शौचालये व बंदराची भिंत कोसळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 7:16 am

Web Title: damage in the %e2%80%8b%e2%80%8bport area of karanja
टॅग Uran
Next Stories
1 उरणकरांची रेल्वेची प्रतीक्षा कायम
2 ऐरोलीत रस्त्यावरून चालताना जरा सांभाळून
3 पाहणी दौऱ्यानंतरही नाले तुंबलेलेच
Just Now!
X