भारतीय संस्कृतीत शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच शास्त्रीय नृत्य, तसेच लोकनृत्याचा मेळ साधून भारतीय नृत्यपरंपरेची एक आगळी ओळख सादर करण्यासाठी वरळी येथील नेहरू सेंटरने ‘नृत्यलावण्य’ महोत्सव २२ आणि २३ जानेवारी रोजी नेहरू सेंटर सभागृहात संध्याकाळी साडेसहा वा. आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ओडिसी नृत्यांगना झेलप परांजपे व लावणी नृत्यांगना आरती काळे नगरकर, तर दुसऱ्या दिवशी कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या शिष्या, तसेच लावणी नृत्यांगना सुरेखा पुणेकर नृत्याविष्कार सादर करतील. यानृत्यमहोत्सवाची मूळ संकल्पना नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक लताफत काझी यांची आहे.