नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत धोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पालिकेच्या वतीने करण्यात येत असून हे सर्वेक्षण विभाग अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत. सर्वेक्षणातील धोकादायक इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मागील वर्षी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ८१ इमारती धोकादायक घोषित केल्या. त्यांची दुरुस्ती किंवा पाडण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने दिले होते; परंतु त्यातील अनेक इमारती तशाच असून त्याही इमारतींचे सर्वेक्षण करून कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. १५ मेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे विभाग अधिकाऱ्याने पालिकेच्या वतीने सूचित केले आहे.

नवी मुंबईमध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत अशा सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
सुभाष गायकर, उपआयुक्त अतिक्रमण विभाग