अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीचे कारखानीस महाविद्यालय आणि नवी दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच महाविद्यालयात ‘१९८० नंतरचे दलित आणि ग्रामीण साहित्याचे बदलते स्वरूप’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
  अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील डॉ. निळकंठ शेरे यांनी चर्चासत्राचे उद्घाटन आणि बीजभाषण केले.
त्यांनी त्यांच्या भाषणात १९८० नंतरच्या बदलत्या परिस्थितीत साहित्य निर्मितीचे क्षेत्रही कसे बदलले याचा धावता आढावा घेतला. दलित साहित्यापेक्षा ग्रामीण साहित्यात अधिक सक्षमपणे जागतिकीकरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसते, असा निष्कर्ष त्यांनी त्यांच्या विवेचनात मांडला.
 या चर्चासत्रासाठी ग्रामीण साहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश देशमुख, डॉ. सुधाकर शेलार, संस्थेचे सचिव श्रीकांत देशपांडे, प्राचार्य डॉ. श्रीकांत वाटवे, प्रा.राजेंद्र डोंगरदिवे, डॉ. अरुण देवरे आणि परिसरातील विविध महाविद्यालयातून ३० प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. विजया देशपांडे, प्रा. सुनीता कुलकर्णी, प्रा. संजय निचिते यांनी प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालन केले. प्रा. संदीपान नवगिरे यांनी आभार मानले.