मुस्लिम समाजातील चालीरीती, तसेच महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा देणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील तुमसन येथील सामाजिक कार्यकर्त्यां रहमतबी करीम बेग मिर्झा यांना कमलताई जामकर स्मृती दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिवाजी महाविद्यालयात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. महिला अत्याचाराविरोधात लढा देताना ४०० स्त्रियांना बुरखामुक्त करून स्वत:च्या पायावर उभे केले. याचे समाधान मोठे असल्याची भावना मिर्झा यांनी या वेळी व्यक्त केली. पंडित म्हणाले, की राजकीय पुढाऱ्यांना सत्तेच्या बळावर हवे ते काम करणे अशक्य नसते. परंतु एखाद्या मुस्लिम महिलेस समाजकार्य करताना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागते. महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष हेमंत जामकर, अॅड. बाळासाहेब जामकर, विजय जामकर यांची उपस्थिती होती.