20 February 2019

News Flash

दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगडावर उत्साहात

अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात सतत नऊ दिवस सज्जनगड येथे चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची सांगता माघ वद्य नवमी अर्थात दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगड येथे पार पडला.

| February 25, 2014 03:55 am

अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात सतत नऊ दिवस सज्जनगड येथे चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची सांगता माघ वद्य नवमी अर्थात दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगड येथे पार पडला. ३०० वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेली सांप्रदायिकता जोपासणारी ही दासनवमी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर साजरी केली जाते. यासाठी विविध राज्यांतून सज्जनगडावर लोकांच्या झुंडी येऊन श्री समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेऊन धन्य होतात.
आज दासनवमीनिमित्त पारंपारिक पद्धतीने सकाळी ४ वाजता काकडआरतीपासून सुरुवात होऊन त्यानंतर महापूजा झाली. या महापूजेमध्ये देशातील मठाधिपतींनी भाग घेतला होता. त्यानंतर प्रवचन व भजनाचा कार्यक्रम होऊन मंदिराभोवती सवाद्य मिरवणुकीत १३ प्रदक्षिणांचा कार्यक्रम पार पडला. या छबिन्यामध्ये मंदिरापासून सुरुवात होऊन पेठेतील मारुती, श्रीधरस्वामी कुटी, धाब्याचा मारुती येथून समारोप मंदिरामध्ये झाला. दुपारी १२ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन समर्थभक्तांनी विविध सेवांचा लाभ घेतला. समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कार्यक्रम पार पडले. यामध्ये समर्थभक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.

First Published on February 25, 2014 3:55 am

Web Title: das navami program celebrated in spirit at sajjangad
टॅग Celebrated,Spirit