येथील आझादनगर पोलिसांनी राबविलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये दोन घरफोडय़ांच्या घरात दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयितांना अटक केली.
जुम्मन शहा मोहंमद सुलेमान शहा (रा. गोल्डननगर)व शकील अहमद अब्दुल अव्वल (रा. आझादनगर) अशी या संशयितांची नावे आहेत. उपअधीक्षक योगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घरफोडय़ा करणाऱ्या संशयितांच्या घरात झडतीसत्र राबविले असता, जुम्मनच्या घरात एक गावठी कट्टा आढळून आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार शकीलच्या घरीही पथकाने धाड टाकली असता, तेथेही एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ही काडतुसे व कट्टे जप्त केले आहेत. दोघांच्या अटकेमुळे शहरात यापूर्वी घडलेल्या काही घरफोडय़ांचा तपास लागण्याची शक्यता आहे. अलीकडेच आझाद चौकातील एका सराफी दुकानात झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेत या दोघांचा निवृत्त मुख्याध्यापकाची लूट
सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून तीन भामटय़ांनी पोपट काळू सूर्यवंशी (रा. कजवाडे) या निवृत्त मुख्याध्यापकाच्या हातातील सोन्याची अंगठी व रोख सहा हजार रुपये असा २१ हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना येथील बजरंग कॉलनी परिसरात घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे चोरटय़ांचे मनोबल किती उंचावले आहे, हेच अधोरेखित होत आहे. सूर्यवंशी हे सोयगाव रस्त्यावरील भाऊसाहेब हिरेनगर येथे आपल्या मुलांकडे आले होते. दुपारच्या वेळी ते दवाखान्यात जाण्यासाठी पायी निघाले असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेले दोघे आणि रस्त्याच्या कडेला उभा असणारा एक अशा तिघांनी सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत त्यांना अडविले व गांजा पितात अशी धमकी देऊन त्यांचे लक्ष विचलित केले. गोंधळलेल्या सूर्यवंशी यांना स्वत:जवळील सहा हजार रुपयांची रोकड व हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी रुमालात ठेवण्यास संशयितांनी भाग पाडले. नंतर बेमालुमपणे हे पैसे व अंगठी घेऊन हे संशयित दुचाकीवरून पसार झाले.