News Flash

कालव्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

पाणी पिताना तोल जाऊन कालव्यात पडलेल्या अतुल रमेश मुधोळ (वय १२) या मुलाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला.

| April 12, 2013 01:52 am

पाणी पिताना तोल जाऊन कालव्यात पडलेल्या अतुल रमेश मुधोळ (वय १२) या मुलाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला.
या मुलाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बेलमंडळ येथील गावकऱ्यांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला नाही.
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील अतुल मुधोळ (वय १२) व देहू अविनाश मुधोळ (वय १६) हे दोघे जण मंगळवारी सायंकाळी शेताकडे जात असताना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरले होते. मात्र, दोघेही पाणी पिताना तोल जाऊन कालव्यात पडले. या घटनेत लोकांनी देहूला वाचविले. अतुल मात्र वाहून गेला.
अतुलचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला. अतुल मुधोळचा पोलीस व ग्रामस्थ मंगळवारी रात्रीपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास डोंगरगाव शिवारातील कालव्यात अतुलचा मृतदेह सापडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:52 am

Web Title: dead body recovered from cannel
टॅग : Dead Body
Next Stories
1 डॉ. आंबेडकर यांचा आदर्श अनुयायांनी ठेवावा – प्रा. कांबळे
2 गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, गीत-संगीताचा कलाविष्कार
3 मैं तो फकीर हूँ, फिर भी सोचेंगे – रामदेवबाबा
Just Now!
X