20 September 2020

News Flash

तरुणाचा मृतदेह सापडला

ऐरोली येथील पटनी कंपनीजवळील एमआयडीसीच्या जागेवर असणाऱ्या खाडीच्या डबक्यामध्ये रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाण्यामध्ये बुडून

| June 23, 2015 06:47 am

ऐरोली येथील पटनी कंपनीजवळील एमआयडीसीच्या जागेवर असणाऱ्या खाडीच्या डबक्यामध्ये रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाण्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाला. वैभव श्रीवर्धन असे तरुणाचे नाव आहे. २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे वैभव श्रीवर्धन व त्याचे आठ मित्र ऐरोली येथे एमआयडीसीच्या भूखंडावर फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते. या वेळी फुटबॉल आणण्यासाठी चार मित्र ऐरोली येथील डीमार्टमध्ये गेले व वैभव व त्याचे तीन मित्र एमआयडीसीच्या भूखंडावर बाजूलाच असणाऱ्या खाडीतील डबक्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. खाडीचा डबका पार करत असताना दम लागल्याने वैभव पाण्यामध्ये बुडू लागला. त्याचे उर्वरित मित्र त्याला दम लागल्याचे पाहून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. खाडीतील डबक्याच्या काठापर्यंत घेऊन येण्यात मित्रांना यश आले, पण त्याचा हात सुटल्याने पुन्हा तो पाण्यात गेला. दुपारी ३ वाजल्यापासून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर सोमवारी मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 6:47 am

Web Title: deadbody of young man found
Next Stories
1 ‘रानसई’ची पाण्याची पातळी वाढली
2 नवी मुंबईत पावसामुळे दाणादाण
3 पनवेलमध्ये १८७ मिलीमीटर पाऊस
Just Now!
X