News Flash

इमारतीवरून पडून रहिवाशाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर ऊन, पावसापासून संरक्षण म्हणून निवाऱ्यासाठी उभारलेल्या शेडवरून पडून डोंबिवलीत नेहरू रस्त्यावरील एका रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला.

| May 21, 2014 07:04 am

इमारतीच्या गच्चीवर ऊन, पावसापासून संरक्षण म्हणून निवाऱ्यासाठी उभारलेल्या शेडवरून पडून डोंबिवलीत नेहरू रस्त्यावरील एका रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला. परेश लीलाधर व्होरा (३८) असे मृत रहिवाशाचे नाव आहे. कच्च्या आंब्याचे काप ताटात ठेवून ते उन्हात वाळवण्यासाठी परेश इमारतीच्या गच्चीवरील निवारा शेडवर चढले होते. पाय घसरल्याने ते खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:04 am

Web Title: death of civilian due to fall down from building
टॅग : Dombivli
Next Stories
1 डावखरे-फाटकांच्या मनसुब्यांना धक्का
2 तरणतलाव दोन महिने बंद
3 ‘चतुरंग’च्या चतुर्थ दशकपूर्ती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Just Now!
X