05 August 2020

News Flash

उजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू

मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

| February 26, 2014 03:02 am

मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
सिद्धाराम कल्लप्पा बन्न्ो (८) व त्याचा भाऊ रेवणसिद्ध (७) अशी दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. मोहोळजवळ गाढवे वस्ती येथे डॉ. शैलेंद्र झाडबुके यांची शेती आहे. त्या ठिकाणी कल्लप्पा बन्न्ो (रा. धूळखेड, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) हा गेल्या दीड महिन्यापासून सालगडी म्हणून काम करीत आहे. पत्नी व दोन लहान मुलांसह वस्तीवर राहात असताना कल्लप्पा याची मुले सिद्धाराम व रेवणसिद्ध यांना आश्रमशाळेत पाठविण्याची सूचना शेतमालक डॉ. झाडबुके यांनी सालगडी कल्लप्पा यास दिली होती. तसेच बाजारहाट करण्यासाठी पैसेही दिले होते. त्यानुसार कल्लप्पा हा पत्नीसह बाजारासाठी निघण्याच्या घाईत असताना त्याची दोन्ही मुले पोहण्यासाठी जवळच्या कालव्यात गेली. परंतु कालव्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्याचा अंदाज आला नाही आणि दोन्ही मुले पाण्यात बुडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2014 3:02 am

Web Title: death of two young in ujani dam
टॅग Death,Ujani Dam
Next Stories
1 पर्यावरण संरक्षणाचा जिल्ह्य़ाचा एकत्रित आराखडा तयार होणार
2 मोटारीच्या काचा फोडून चो-या करणा-या तरुणास अटक
3 ‘पंचगंगा’ प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
Just Now!
X