सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय रविवारी होणार असून जिल्हा परिषद अध्यक्षांसह समिती सभापतींना राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासरावदे यांनी एक महिन्यापूर्वी दिले होते. गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी होणा-या बठकीत याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे इच्छुक सदस्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून अन्य सदस्यांना पदे मिळावीत यासाठी पक्ष नेत्यांनी पदाधिकारी बदलाचा निर्णय २७ ऑगस्ट रोजी जाहीर केला होता. त्यानुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष िशदे यांनी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष बसवराज पाटील, बांधकाम सभापती देवराज पाटील, कृषी समितीचे सभापती आप्पासाहेब हुळ्ळे, महिला व बालकल्याण सभापती छायाताई खरमाटे, समाजकल्याण सभापती राधाबाई हक्के यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. अध्यक्ष देशमुख यांच्यासह  देवराज पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे यांनी तत्काळ राजीनामा दिले. उपाध्यक्ष बसवराज पाटील हे जनसुराज्य पक्षाचे असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव जगताप यांच्यावर सोपविण्यात आली होती.
महिला सभापती श्रीमती हक्के आणि श्रीमती खरमाटे यांनी मात्र राजीनामा देण्यास टाळाटाळ चालविली होती. या दोघीही गृहमंत्री श्री. पाटील यांच्या समर्थक मानल्या जातात. जिल्हाध्यक्ष श्री. िशदे यांनी आदेश देऊनही नेत्यांशी चर्चा करून राजीनामा देण्याचा पवित्रा या महिला सभापतींनी घेतला होता.
जयंत पाटील व आर. आर. पाटील रविवारी सांगली दौ-यावर येणार असून त्या दिवशी दोघांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाची बठक होण्याची शक्यता आहे. या बठकीत अध्यक्षांचा राजीनामा मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नवीन पदाधिकारी निवडीसाठी त्यानंतरच कार्यवाही होणार असली तरी इच्छुकांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. अध्यक्षपदासाठी वाळवा तालुक्यातील देवराज पाटील हे प्रमुख दावेदार म्हणून मानले जात आहेत.