भावसार व्हिजन इंडियाच्या प्रांतपालपदी सोलापूरचे दीपक आकुडे यांची निवड झाली. यापूर्वी त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या संस्थेच्या अधिवेशनात या निवडीवर शिक्कमोर्तब झाले. दीपक कृष्णा आकुडे हे कापड व्यावसायिक असून गेल्या ४० वर्षांपासून नव्या पेठेत विलास मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय नावारूपास आला आहे. भावसार क्षत्रिय समाज संस्थेसह श्री िहगलाजमाता सहकारी पतसंस्था आदी संस्थांशी ते संबंधित आहेत. भावसार व्हिजन इंडियाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यापूर्वी सांभाळली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर प्रांतपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी सोलापुरातील ज्येष्ठ वास्तुविशारद केशव कटारे, गिरीश वायचळ व सुहास क्षीरसागर यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.