येत्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याला विरोध करणारे राजकीय पक्ष व व्यक्तींना पराभूत करा, असे आवाहन विदर्भ राज्य निर्माण समितीचे संयोजक उमेश चौबे यांनी पत्रकार परिषदेत केले.
ही विधानसभा निवडणूक स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करू शकते. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आश्वासनांची खैरात करू शकते. त्यामुळे गोंधळून न जाता मतदारांनी योग्य विचार करून मतदान करावे तसेच जे राजकीय पक्ष किंवा व्यक्तीचे धोरण स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विरोधात असतील, त्यांचा विरोध करण्याचे धोरण राबवावे, अशा विरोधी पक्षाच्या विरोधात जनतेने आपला कौल नोंदवून त्या पक्षाचा विदर्भातील जनतेने धिक्कार करावा, अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली.
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी ज्या संघटना व व्यक्ती सातत्याने काम करत आहेत, त्या सर्वानी विदर्भ विरोधी पक्षांना विरोध करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करावे, अशीही विनंतीही चौबे यांनी केली.
यावेळी माजी कुलगुरु प्रा. हरिभाऊ केदार, डॉ. गोविंद वर्मा, किशोरसिंह बैस, सतीश इटकेलवार, अॅड. मनोज साबळे उपस्थित होते.