विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या दुकानांचे नाव ‘लिकर शॉप’ असे ठेवण्याची मागणी नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव (वाहतूक व अबकार) शैलेशकुमार शर्मा यांच्याकडे केली आहे. शर्मा येथे आले असता त्यांनी जिल्ह्य़ातील वाइन उत्पादकांशी चर्चा केली. त्या वेळी पवार यांनी ही मागणी केली.
ज्या दुकानांमध्ये मुख्यत्वे वाइनची विक्री केली जाते. त्यांना ‘वाइन शॉप’ असे नाव द्यावे. तसेच ज्या दुकानांमध्ये मद्य व वाइन यांची विक्री होते त्या दुकानांना ‘लिकर व वाइन शॉप’ असे नाव देण्याची सूचना पवार यांनी याप्रसंगी केली. अमेरिकेत या पद्धतीनुसारच दुकानांची नावे असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेच्या वतीनेवाइनविषयक प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याविषयी वाइन उत्पादकांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले.
बैठकीस पवार यांच्यासह शिवाजी आहेर, राजेश जाधव, सदाशिव नाथे आदी उपस्थित होते.