News Flash

उड्डाण पुलालगतच्या रस्त्यावर ‘सिग्नल’ची मागणी

मुंबई-आग्रा महामार्गावर शहरात उड्डाण पूल तयार होत असताना अनेक ठिकाणी चौफुलींवर वाहतूक कोंडी तसेच अपघात होऊ लागल्याने अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी भिमशक्ती

| April 26, 2013 02:43 am

मुंबई-आग्रा महामार्गावर शहरात उड्डाण पूल तयार होत असताना अनेक ठिकाणी चौफुलींवर वाहतूक कोंडी तसेच अपघात होऊ लागल्याने अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी भिमशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या मार्गावर गरवारे पाँइंट, पाथर्डी फाटा, डॉ. भाभानगर, इंदिरानगर, भुजबळ फार्म, व्दारका सर्कल, तिगरानिया पाँइंट, जुना आडगाव नाका, के. के. वाघ महाविद्यालय, रासबिहारी चौफुली, जत्रा हॉटेल अशा सर्व ठिकाणी सिग्नलची गरज आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अशा ठिकाणी अपघात होत असून सिग्नलमुळे अपघातांना आळा बसू शकेल. उड्डाण पुलाच्या दुतर्फा जाणाऱ्या रस्त्यांवर वसाहतींकडे जाणाऱ्या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची आवश्यकता आहे. उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या हॅलोजनचा प्रकाश रस्त्यावर येत नाही. त्यामुळे उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर हॅलोजन, मक्र्युरी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या भीमशक्तीच्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अविनाश आहेर, जगदीश पवार, सूर्यकांत आहेर, मोहन जगताप आदींची स्वाक्षरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:43 am

Web Title: demand for signal on road near to fly over
Next Stories
1 सूर हरविलेल्या शिवसेनेसाठी संवाद दौरा
2 पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणी पोहोचविण्यासाठी प्रशासनाची कसरत
3 जलभूमी संधारणातून नापीक जमिनीची सुपीकतेकडे वाटचाल
Just Now!
X