सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंगळवारी महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना देण्यात आले.शहराध्यक्ष महेश जाधव यांनी कारवाईबाबत विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
 महापालिकेच्या सुवर्णजयंती रोजगार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे गेल्या सहा महिन्यापासून देत आहे. प्रकल्प संचालिका शारदा पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आले, तेंव्हा त्यांना निलंबित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही, असे सांगून जाधव यांनी पाटील यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा पुन्हा एकदा आयुक्तांसमोर वाचला.    
शिष्टमंडळात शहर उपाध्यक्ष विजय जाधव, संतोष भिवटे, संदीप देसाई, श्रीकांत घुंटे, अशोक लोहार,पपेश भोसले, डॉ.शेलार, मधुमती पावनगडकर, किशोरी स्वामी यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.