‘स्त्री-शक्तीचा सन्मान करा आणि बलात्काऱ्यांना फाशी द्याह्ण अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अंबरनाथ युवा मंचने पूर्व विभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नुकतेच दिले. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाऱ्यांचा निषेध करण्यासाठी मंचने बलात्कारी पुरुषाच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली. त्याला चपलांचा हार घालण्यात आला. शिवाजी चौक, वडवलीमार्गे शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश एकबोटे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 8:49 am