30 September 2020

News Flash

विजय पांढरे यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून पराभूत झालेले आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे हे आपल्या गावी निघून गेले असले तरी त्यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप करण्यात येत

| May 24, 2014 01:03 am

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून पराभूत झालेले आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे हे आपल्या गावी निघून गेले असले तरी त्यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप करण्यात येत असून त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी मुकुंद बेणी यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाकडे त्यांनी यासंदर्भात निवेदनाव्दारे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना विजय बळवंत पांढरे असे नाव धारण करणाऱ्या पांढरे यांनी निवडणूक अर्जात विजय बळीराम पांढरे असे नाव लावले. शासकीय सेवेतून निवृत्त होईपर्यंत व त्यानंतरही या दोन्ही नावाचा वापर करत त्यांनी आपले सर्व व्यवहार सुरळीत पार पाडले. अशा पद्धतीने एक व्यक्ती दोन नावाने कसा व्यवहार करू शकते, हे कायद्याच्या कोणत्याच कक्षेत बसत नाही. असे असताना पांढरे यांनी आजवर सर्रासपणे आर्थिक व्यवहारातही दोन नावांचा वापर केल्याचा आरोप बेणी यांनी निवेदनात केला आहे.
पक्षाचे स्वतंत्र खाते असताना पांढरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पासबूक व्यतिरिक्त आरटीओ कॉर्नरवरील स्टेट बँक शाखा आणि महात्मानगरची इंडियन ओव्हरसिस बँक तसेच जळगाव, बुलढाण्यातील त्यांची बँक खाती व त्यावर तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या पासबुकावर निवडणूक काळात झालेले व्यवहार याची सखोल चौकशी करण्याची मागणीही बेणी यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:03 am

Web Title: demand to inquire about vijay pandhare papers
Next Stories
1 खासगी शाळांतील शिक्षकांचे पगार अखेर ऑनलाइन!
2 देवळाली कॅम्पच्या पाणीटंचाईवर तोडगा
3 निवासव्यवस्था तोकडी
Just Now!
X