News Flash

इंदिरा आवास घरकुलांची नुकसानभरपाई देण्याची मागणी

गोरेगाव तालुक्यातील तेढा ग्रामपंचायतीत १९९६-९७ या आíथक वर्षांत इंदिरा आवास योजनेअंतर्गत १२ घरकुलांची बांधकामे मंजूर झाली होती. ही बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे

| July 2, 2013 08:21 am

गोरेगाव तालुक्यातील तेढा ग्रामपंचायतीत १९९६-९७ या आíथक वर्षांत इंदिरा आवास योजनेअंतर्गत १२ घरकुलांची बांधकामे मंजूर झाली होती. ही बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे  निदर्शनास येते. या १२ संकुलापकी एका संकुलाची स्लॅब ६ जूनला कोसळली. याप्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. लाभार्थीना तत्काळ राहण्याची दुसरी पर्यायी व्यवस्था व नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने गोरेगावच्या तहसीलदार हंसा मोहने, तसेच खंडविकास अधिकारी शहारे यांना देण्यात आले.
मंजूर रक्कम २८ हजार ५०० लाभार्थीचा हिस्सा १५०० प्रती घरकुल, याप्रमाणे या घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. हे काम ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. लाभार्थीनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन सरपंच व सचिवांमार्फत कंत्राटदारांकडून ही कामे करवून घेण्यात आली होती. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते, असे निदर्शनास येते. त्यामुळेच या १२ संकुलांपकी एका संकुलाची स्लॅब ६ जूनला पूर्णत कोसळली. या घरातील राहणाऱ्यांचे जीव थोडक्यात वाचले असले तरी किरकोळ दुखापत त्यांना झाली. उर्वरित ११ घरांची स्लॅबसुद्धा पडण्याच्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात कुठल्याही क्षणी मोठा धोका होऊ शकतो. या १२ संकुलांमध्ये ६० लोक वास्तव्यास राहतात. याची दखल वेळीच घेतली गेली नाही तर भविष्यामध्ये मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. लाभार्थीना तत्काळ राहण्याची दुसरी पर्यायी व्यवस्था व नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निवेदन युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे हंसा मोहने व खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 8:21 am

Web Title: demand to recover the loss of indira awas scheme
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 पीककर्जाचे ३८ टक्के वाटप, उर्वरित कर्जवाटप लवकरच
2 विद्यार्थ्यांमध्ये चिकाटीची भावना निर्माण करा – मोघे
3 कांचन मेश्राम खून प्रकरणी दोन आरोपींना फाशी
Just Now!
X