मध्य प्रदेशमधील अनुज चोरडिया यांनी चीनमधून िझक धातू आयात केला होता. मात्र चीनमधून त्याऐवजी कंटेनरमध्ये चक्क दगड आले. यासंदर्भात आपली फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी उरण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
चोरडिया यांनी चीनमधील सिझिया झुगांगकिया किशू या कंपनीकडून ५० टन िझग धातू मागविला होता. तो चीनमधून जेएनपीटी बंदरात येणार होता. त्यानुसार चीनच्या कंपनीने माल पाठविला. मात्र चीनमधून पाठविण्यात आलेल्या कंटेनरमधून िझक धातू ऐवजी ५० टन दगडी खडी आल्याने चोरडिया यांनी उरण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साडे एकावन्न लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.