एमआयएम खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी शहरात येऊन धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले. त्यांच्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ओवेसी यांना या पुढे शहरात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी करण्यात आली. पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा, मनपाचे गटनेते गजानन बारवाल, जिल्हा संघटक सुनीता आऊलवार आदींची उपस्थिती होती.