20 September 2020

News Flash

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला तडीपारीची नोटीस

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांना मंगळवारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातून तडीपार करण्याची नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ यांनी बजावल्याने राजकीय वर्तुळात

| February 8, 2014 02:33 am

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांना मंगळवारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातून तडीपार करण्याची नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ यांनी बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येथील मद्य व्यावसायिक दीपक जयस्वाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात चार, तर गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात मद्य तस्करीचा एक गुन्हा दाखल आहे. त्यांना या प्रकरणात गोंडपिंपरीचे ठाणेदार प्रवीण परदेशी यांनी अटकही केली होती. जानेवारी २०१३ मधील हे प्रकरण राजकीय वर्तुळात गाजले होते. याच प्रकरणामुळे जयस्वाल यांना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले होते. १० सप्टेंबर १९९९ ते आजपर्यंत जयस्वाल यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भुजबळ यांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
४ फेब्रुवारीला ही नोटीस बजावण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाऱ्याच्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 2:33 am

Web Title: deportation notice to ncp city president
Next Stories
1 ‘आप’ साठी विदर्भातील इच्छुकांची मुंबईत मुलाखतीसाठी गर्दी
2 गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक मदतीपासून अद्याप वंचित
3 राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांसाठी ‘वसंत’ बहरणार
Just Now!
X