02 March 2021

News Flash

लातूर महापालिकेच्या आकृतिबंधास मंजुरी

लातूर महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाला यश आले. महापालिकेत आता ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १ हजार ३६५

| May 10, 2013 01:05 am

लातूर महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाला यश आले.
महापालिकेत आता ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १ हजार ३६५ कर्मचारी राहणार आहेत. लातूर शहराला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा आकृतिबंध सोमवारी फारसा बदल न करता मंजूर केला. लातूर शहराचे पाच विभाग करून तेथे स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यालयात विभागनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, पर्यावरणसंवर्धन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, ७ सहायक प्रभारी अधिकारी, मूल्यनिर्धारक, करसंकलन अधिकारी, पाच अधीक्षक, ११ सचिव, नगरसचिव, प्रशासन मुख्य लेखा, लेखापरीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी असे ४० वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होणार आहेत. स्थापत्य व पाणीपुरवठा असे दोन अभियंते मिळणार आहेत. स्थापत्य शाखेत ५ उपअभियंते, ५ शाखा अभियंते, ५ कनिष्ठ अभियंते, ४ सहायक, ५ लिपिक, ५ शिपाई असा कर्मचारीवर्ग राहणार आहे. पाणीपुरवठा शाखेत १७जणांचा समावेश असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:05 am

Web Title: design sanction of latur municipal corporation
Next Stories
1 राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पाठबळावर औशाचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे
2 धनादेश न वटल्याने तीन महिने कारावास
3 शेतकरी कर्जमुक्ती समितीची १३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे निदर्शने
Just Now!
X