20 November 2017

News Flash

वांद्रे भागात ‘लोकसत्ता यशस्वी भव’ पुस्तिकेचे वाटप

‘लोकसत्ता’ आणि युवा सेना वांद्रे विधानसभा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसत्ता यशस्वी भव पुस्तिकेचा

प्रतिनिधी | Updated: December 28, 2012 12:10 PM

‘लोकसत्ता’ आणि युवा सेना वांद्रे विधानसभा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसत्ता यशस्वी भव पुस्तिकेचा वितरण समारंभ वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात नुकताच पार पडला. हा उपक्रम व्यावसायिक चौरंगी ग्रुप ऑफ कंपनीचे अतुल शिरोडकर आणि नगरसेवक अनिल त्रिंबककर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधी विद्यामंदिर, नवजीवन विद्यामंदिर आणि रामकृष्ण परमहंस मार्ग मुंबई महापालिका शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घेतला. या समारंभास आमदार प्रकाश (बाळा) सावंत, अतुल सरपोतदार, अनिल त्रिंबककर, शाळेचे सचिव मिलिंद चिंदरकर, मुख्याध्यापिका गावकर, रा. प. महापालिका शाळेचे भोईर, अतुल लोटणकर, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक तसेच वांद्रे विधानसभा भागातील युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on December 28, 2012 12:10 pm

Web Title: destribution of loksatta yashasvi bhava books in bandra area