हौसला बुलंद है!
काटोल तालुक्यातील मूर्ती या छोटयाशा गावात राहणारा अशोक मुन्ने हा अपंग तरुण ‘मिशन एव्हरेस्ट’वर निघाला असून, जगातील सर्वात उंच, चढण्यासाठी कठीण आणि पावला पावलावर आव्हानांनी भरलेले हिमालयाचे शिखर पादाक्रांत करायचा दृढ संकल्प अशोकने केला आहे. रेल्वे अपघातात जखमी झाल्याने अशोकचा उजवा पाय गुढघ्यापासून खाली कापावा लागला. त्यामुळे कृत्रिम पायाच्या आधारावर अशोकला त्याची जिद्द पूर्ण करावी लागणार आहे.
बालपणापासूनच खेळात रुची असलेला अशोक धावणे, पोहणे, जिम्नॅस्टिक, कराटे आणि मार्शल आर्टस्मध्ये तरबेज होता. विशेषत: गिर्यारोहण आणि जंगल अशोक अवघा २४ वर्षांचा असताना ३ फेब्रुवारी २००८ या दिवशी नुकतीच सुटलेली गीतांजली एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात अशोक रेल्वेखाली ओढला गेला. बेशुध्दावस्थेत त्याला सरकारी इस्पितळात कोणीतरी दाखल केले. जेव्हा शुध्द आली तेव्हा अशोकला उजवा पाय गमावून बसल्याचे कळले. नियतीने त्याच्या स्वप्नांना दिलेला हा मोठा हादरा होता. अपंगाचे जीणे नशिबी आल्याने आई-वडिलांचा एकुलता एक आधार असलेल्या अशोकच्या मनात आई-वडिलांबद्दल काळजीचे वादळ घोंघावू लागले. मात्र, अशा अप्रिय घटनेकडेही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहताना लाख मोलाचा जीव वाचला, अशा भावनेने त्याची जिद्द आणखीनच पेटली.
अशोक तशाही परिस्थितीशी झुंज देण्यासाठी स्वतला तयार करत होता. परंतु, आता पुढे नेमके करायचे काय हे स्पष्ट नव्हते. त्याच्याजवळ दोन पर्याय होते, एक म्हणजे परिस्थितीला दोष देत रडतकुथत आयुष्य ढकलणे आणि दुसरा नव्या जोमानं नव्या जीवनाचा आरंभ करणे. अशोकने कठीण विकल्प निवडला. अशोकच्या परिचयातील दयाराम भोयर या सदगृहस्थाने मानसिक धैर्याचे पाठबळ दिले. पाय गमावल्यामुळं आता कृत्रिम पाय बसवणे हाच एक पर्याय होता. त्यानंतर सप्टेंबर २००९ मध्ये डॉ. राजन यांनी शस्त्रक्रिया करून अशोकला कृत्रिम पाय बसवण्याची व्यवस्था केली. शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च इंद्रधनू संस्थेच्या वतीने मालती शास्त्री यांनी उचलला. नेमक्या त्याच काळात एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या कृष्णा पाटील हिच्या एव्हरेस्ट चढाईच्या बातम्या झळकत होत्या. आपणदेखील माऊंट एव्हरेस्ट सर करू शकतो, हा विचार अशोकच्या मनात विजेसारखा चमकून गेलाआणि तसा निर्धार अशोकन पक्का करून टाकला. कृत्रिम पायाच्या मदतीनं अशोक आधी चालायला शिकला. नंतर सायकल, बाईक, आणि कार सुध्दा चालवू लागला. एवढेच नाहीतर त्यानं परत जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्टची प्रॅक्टिसकरून गावातील मुलांना शिकवणे सुरू केले.
यादरम्यान त्याने गावाच्याच बाजूला असलेला चिखलागड हा पहाड रोज चढायला सुरवात केली. सालबर्डीची पहाडी, सातपुडा रांगेतील सर्वात कठीण चढाई असलेला निशाणगड सर केला तसेच २० कि.मी. प्रवास पायी केला. यानंतर २०११ साली दुसऱ्यांदा निशाणगड सर केल्यानंतर ४५ किमी अंतराचा प्रवास पायी केला. दरम्यानच्या काळात मिळेल ती टेकडी मुद्दाम कठीण बाजूने चढून जाण्याचे वेडच अशोकला लागले. भल्याभल्यांना घाम फोडणारी कार नदी प्रकल्पाची ८० अंशांची कोन असलेली ९० फूट उंचीची िभत त्याने कोणत्याही साधनसामुग्री शिवाय सहज सर केली. कडाक्याच्या थंडीतही शरीराचं तापमान संतुलित ठेवणारी प्राणायम पध्दती अशोकने कामारेडडी, हैदराबाद येथील आर्श गुरूकुलातून स्वामी ब्रम्हानंद स्वरस्वती यांच्याकडून आत्मसात केली.
मीरा शिखर सर करणारा जगातला पहिला भारतीय अपंग गिर्यारोहक म्हणून अशोकला गौरव प्राप्त झाला आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठी साधारणत: ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु माघार घ्यायची नाही, हे त्यानं मनाशी पक्के केले असून, त्याच्या ध्येयप्राप्तीने असंख्य अपंगाना जगण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. पी. अँड ओ इंटरनॅशनल या अमेरिकन कंपनीने साडे पाच लाख रूपयाचा कृत्रिम पाय विनामूल्य बनवून दिला आहे.
केवळ आíथक अडचणीमुळे हे मिशन अशोकला थोड पुढ ढकलावे लागले आहे. परंतु, हौसला बुलंद आहे! अपंगत्व येण म्हणजे जीवनाचा आणि आशेचा अंत नव्हे. त्यामुळे अशोकला मदत करून अनेकांना त्याच्या मिशनमध्ये सहभागी होता येऊ शकते.
इच्छुकांना त्याच्या खाते क्रमांक ३१४३ ५५०९ ७८४ भारतीय स्टेट बँक दीनदयाल नगर, शाखा नागपूर येथे आयएफएससी : एसबीआय एन ०००९०५७ येथे   किंवा    भ्रमणध्वनी     ०९२७३८१२१०० किंवा ई-मेल –  ं२ँ‘.े४ल्लल्ली@ॠें्र’ .ूे  वर    संपर्क साधता येऊ शकतो.