News Flash

शरद पवारांनी गारपीटग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले – फडणवीस

महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरील आपत्ती ही राष्ट्रीय आपत्ती होऊ शकत नाही, असे सांगुन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

| March 22, 2014 12:16 pm

महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरील आपत्ती ही राष्ट्रीय आपत्ती होऊ शकत नाही, असे सांगुन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे एका वार्ताहर परिषदेत केला.
राज्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी भाजपने राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्वसन न करता कर्ज १०० टक्के माफ करावे, असा प्रस्ताव केंद्राला पाठवा, अशी सूचना केली होती, पण शरद पवारांनी कशासाठी राष्ट्रीय आपत्ती, असा उलट सवाल करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय बंॅकांनी घ्यायचा आहे, असा अनाकलनीय सल्ला देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारच्या तिजोरीत पसा नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली असती तर केंद्राकडून १०० टक्के अनुदान मिळाले असते, असा दावा करून फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असून ती मिळेल की नाही, हे देखील शंकास्पदच आहे. कारण, याबाबत पूर्वानुभव अतिशय वाईट आहे. राज्य सरकारच्या पॅकेजचे वर्णन फडणवीस यांनी ‘टु लिटील, टू लेट’ या शब्दात केले. यावेळी सेनच्या उमेदवार भावना गवळी व माधव भंडारी, मदन येरावार, ज्ञानोबा मुंडे, राजु डांगे, राजू पडगीलवार आदी भाजप नेते हजर होते. निवडणूक आचारसंहितेचा बागुलबुवा करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाकारण्याच्या प्रकारामुळे आणि आचारसंहितेचे स्पष्ट निकष नसल्यामुळे या आचारसंहितेला अत्याचार संहिताच म्हटले पाहिजे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या आड आचारसंहिता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या पटलावर म्हटले होते आणि हेच मुख्यमंत्री निवडणूक आयोगासमोर मदतीच्या पॅकेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी गेले आहे, हा सारा विरोधाभास अजब आहे. आचारसंहितेच्या अशा बडग्यालाच सुरुवातीपासून आमचा विरोध आहे. राज्यपालांना भेटून मागण्यांचे निवेदन आम्ही देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मोदी अती आत्मविश्वासी नाहीत
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दोन ठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत, याचा अर्थ एक तर त्यांच्यात आत्मविश्वास नाही किंवा ते अती आत्मविश्वासी आहेत, असा आहे काय, असा प्रश्न वार्ताहरांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधानपदाचे उमेदवार दोन ठिकाणी लढण्याची आपल्या देशात परंपराच आहे. लोकभावना लक्षात घेऊनच मोदीसुध्दा दोन ठिकाणी लढणार आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास नाही किंवा ते अति आत्मविश्वासी आहेत, असे म्हणणे गर असून मोदी यांच्यात दृढ आत्मविश्वास आहे. भाजप विचारांशी बांधिलकी नसलेल्या इतर पक्षांतील कलंकित नेत्यांना भाजपत प्रवेश देणे गरच आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत ‘पोलिटिकल रिअ‍ॅलिटी’चा विचार करून कांॅग्रेससारख्या काही भाजपेतर पक्षातील एका दोघांना भाजपत प्रवेश आणि उमेदवारी दिल्या गेली, असे प्रामाणिक आणि रोखठोक स्पष्टीकरण एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2014 12:16 pm

Web Title: devendra phadnis slams sharad pawar over farmers help
Next Stories
1 महिलांनी सन्मानाने जगून विकासात योगदान द्यावे -उमा भारती
2 नागपूर रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या तुलनेची विविध विकासकामे – सुनीलकुमार सूद
3 पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेत पैसे गुंतविण्यात अडचणी
Just Now!
X