25 September 2020

News Flash

‘नागपूर आंदोलनात नाशिकचे वारकरीही सहभागी होणार’

महाराष्ट्रासह देशात वाढत जाणाऱ्या गोहत्या तसेच कत्तलखान्यांच्या वाढती संख्येविरोधात वारकऱ्यांच्या वतीने बुधवारी नागपूर येथे आंदोलन करणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व बंडातात्या कराडकर, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, रामेश्वरशास्त्री

| December 19, 2012 02:28 am

महाराष्ट्रासह देशात वाढत जाणाऱ्या गोहत्या तसेच कत्तलखान्यांच्या वाढती संख्येविरोधात वारकऱ्यांच्या वतीने बुधवारी नागपूर येथे आंदोलन करणार आहे.
आंदोलनाचे नेतृत्व बंडातात्या कराडकर, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, रामेश्वरशास्त्री जुन्नरकर करणार आहेत. आंदोलनात नाशिकमधील वारकरीही  सहभागी होणार असल्याची माहिती वारकरी महामंडळाचे सचिव पुंडलिक थेटे यांनी दिली.
एकीकडे कत्तलखान्यांची चौकशी होत नाही. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी गाई, म्हशी, कर्जावर घेतल्या आहेत त्यांचे कर्जाचे हप्ते बाकी राहिल्यास बँका तगादा लावतात. यंदा कमी पावसामुळे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी विहिरींना पुरेसे पाणी नाही. त्यामुळे जिथे पिण्यासाठी पाणी नाही तेथे पशूधन कसे सांभाळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गोहत्या थांबणे, शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन करणे, शेतीपिकासाठी थेट शेतकऱ्यांच्या हातात कृषी योजनांचा निधी मिळणे, शासकीय स्तरावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वैरण
निधीतील दलालांचा सुळसुळाट थांबवून तो निधी खऱ्या गरजू शेतकऱ्याला मिळणे, गाईंचे पालनपोषण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे, महत्वाचे असल्याचे थेटे यांनी म्हटले आहे.
गोहत्या बंदीचा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर होत नसल्याने गाई नष्ट होत चालल्या आहेत. त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यासाठी महाराष्ट्रात ज्या गोशाळा आहेत त्यांना भरीव असे अनुदान शासनाने द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दारूच्या व्यसनांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरांसह खेडय़ातही मोठय़ा प्रमाणात तरुणवर्ग व्यसनांच्या आहारी गेला आहे. शासनाचे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील वारकरी मोठय़ा प्रमाणावर सहभागी होतील, असे त्यांनी म्हटले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 2:28 am

Web Title: devotee of nasik participate in nagpur agitation
Next Stories
1 वणी परिसरात घरफोडय़ांचे सत्र
2 मंगरूळ मध्यम प्रकल्प किंमतवाढीपेक्षा लाभ अधिक – भाग-११
3 ‘स्थायी’च्या बैठकीत आयुक्त व सदस्यांत खडाजंगी
Just Now!
X