एकीकडे महायुती आणि आघाडीत जागा वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत, तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवसांचा अवधी असताना पितृपक्ष आटोपताच विविध राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
काँग्रेसने ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात विदर्भातील ३३ उमेदवारांचा समावेश आहे. विदर्भात बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ, चिखली- राहुल बोंद्रे, खामगाव- दिलीप सानंदा, आकोट- महेश गणगणे, बाळापूर- सुभाष झनक, रिसोड- अमित झनक, धामनगाव रेल्वे- वीरेंद्र जगताप, तिवसा- अ‍ॅड. यशोमती ठाकूर, मेळघाट- केवलराम काळे, अचलपूर- अनिरुद्ध देशमुख, आर्वी- अमर काळे, देवळी- रणजित कांबळे, सावनेर- सुनील केदार, रामटेक- सुबोध मोहिते, तुमसर- प्रमोद तितरमारे, साकोली- सेवक वाघाये, गोंदिया- गोपालदास अग्रवाल, आमगाव- रामरतनबाबू राऊत, आरमोरी -आनंदराव गेडाम, गडचिरोली- सगुणा तलांडी, राजुरा -सुभाष धोटे, ब्रम्हपुरी- विजय वडेट्टीवार, चिमूर- अविनाश वारजुकर, वणी- वामनराव कासावार, राळेगाव- वसंत पुरके, उमरखेड- विजयराव खडसे, दक्षिण-पश्चिम नागपूर- प्रफुल्ल गुडधे पाटील, मध्य नागपूर- अनिस अहमद, दक्षिण नागपूर- सतीश चतुर्वेदी, पश्चिम नागपूर- विकास ठाकरे आणि पूर्व नागपूर- अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मनसेचे विदर्भातील उमेदवार जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात पहिली यादी जाहीर केली असून त्यात बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड, चिखली- विनोद खरपस, सिंदखेडराजा- विनोद वाघ, आकोट- प्रदीप गावंडे, अकोला पश्चिम- पंकज साबळे, मूर्तीजापूर- रामा उंबरकर, रिसोड- राजू राजे पाटील, धामणगाव- ज्ञानेश्वर धाने पाटील, तिवसा- डॉ. आकाश वानखेडे, दर्यापूर- गोपाल चंदनखेडे, अचलपूर- प्रवीण तायडे, हिंगणघाट- अतुल वांदिले, वर्धा- अजय हेडाऊ, काटोल- दिलीप गायकवाड, हिंगणा- किशोर सरायकर, नागपूर मध्य- श्रावण खापेकर, नागपूर पश्चिम- प्रशांत पवार, तुमसर- विजय सहारे, भंडारा- मनोहर पटोले, तिरोडा- दिलीप जयस्वाल, गडचिरोली- मीना कोडापे, राजुरा- सुधाकर राठोड, बल्लारपूर- अ‍ॅड. हर्षल चिपळूणकर, चिमूर- अरविंद चांदेकर, वरोरा- डॉ. अनिल बुजोणे आणि वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बसपाची दुसरी यादी जाहीर
बहुजन समाज पक्षाने चार दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांनी दुसरी यादी जाहीर केली असून त्यात खामगाव मतदारसंघातून राहुल अबागड, जळगाव जामोद- त्र्यंबक निकाळजे, आकोट- नंदकिशोर दाबेराव, बाळापूर- अरुण बगारे, वाशीम- राहुल भगत, कारंजा लाड- उस्मान गर्वे, अमरावती- मिर्झा नईम बेग, मेळघाट- किसन जामकर, देवळी- उमेश म्हैसेकर, रामटेक- भगवान भोंडे, राजुरा- भारत आत्राम, वरोरा- अ‍ॅड भूपेंद्र रायपुरे आणि यवतमाळ मतदारसंघातून मो. शम्मी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.