28 January 2020

News Flash

मोदीलाट अल्प प्रमाणात रोखल्याचे आघाडीला समाधान

दिंडोरी लोकसभा निवडणुकीतून विजयाची ‘हॅट्रीक’ नोंदविताना महायुतीचे उमेदवार खा.

| May 20, 2014 07:02 am

दिंडोरी लोकसभा निवडणुकीतून विजयाची ‘हॅट्रीक’ नोंदविताना महायुतीचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातूनही आघाडी घेत राष्ट्रवादीला धक्का दिला असला तरी मोदीलाटेत सर्वच मतदारसंघात ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य चव्हाण यांना मिळाले असताना दिंडोरीत केवळ तीन हजाराचेच मताधिक्य त्यांना मिळाल्याचे राष्ट्रवादीला समाधान वाटत आहे.
     माजी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुका तसेच कोचरगाव, अहिवंतवाडी या आपल्या प्रभाव क्षेत्रात पक्षाच्या उमेदवाराला अधिक मते मिळवून देत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र पूर्व भागात शिवसेनेचे वाढते प्रस्थ पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पेठ तालुक्यावर एकहाती सत्ता असलेले भास्कर गावित यांची विधानसभेसाठी शिवसेनेची संभाव्य दावेदारी पेठमध्ये झालेल्या घसरगुंडीने काहीशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पेठ तालुक्यासह पश्चिम भागात मिळालेली आघाडी मोदी लाटेच्या जोरावर दिंडोरी तालुक्याचे पूर्व भागातून मोडीत काढण्यात आ. महाले यांना यश मिळाले असले तरी मोदी लाटेतही पेठ तालुक्यात राष्ट्रवादीचा एकही सदस्य नसताना, पंचायत समिती, दोन्ही जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या ताब्यात असताना राष्ट्रवादीला आघाडी मिळाल्याने खा. चव्हाण यांच्यासह पेठच्या भास्कर गावित यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या दिंडोरीच्या पूर्व भागातील राष्ट्रवादीची होत असलेली पिछेहाट त्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना मतदारसंघातून १७ हजाराची आघाडी मिळाली होती. यंदा मात्र तालुक्याबाहेरील उमेदवार असल्याने व गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली गेली. विधानसभेतील यशानंतर पेठ तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद सदस्य तसेच दिंडोरी, खेडगाव, वणी या गटात शिवसेना तर उमराळे गटात भाजपच्या सदस्या निवडून आल्या. कोचरगाव व अहिंवंतवाडी या गटात राष्ट्रवादीचे सदस्य आहे. एकंदरीत शिवसेना-भाजपची दिंडोरी मतदारसंघातील ताकद पाहता हरिश्चंद्र चव्हाण यांना मोठी आघाडी मिळण्याची आशा महायुतीला होती. आ. महाले यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेत गावोगाव जावून प्रचार केला. त्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राजे, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम जाधव, ज्येष्ठ नेते बाजीराव कावळे, सुरेश डोखळे, गटनेते प्रवीण जाधव आदींची साथ मिळाली. आ. महाले यांनी केलेली कामे व आघाडी शासनाबद्दल जनतेतील नाराजी यावर प्रचारात भर दिला. मोदी लाटेवर स्वार होत भरभक्कम आघाडी मिळेल असा महायुतीचा अंदाज होता. मात्र पेठ तालुक्यात तसेच दिंडोरीच्या पश्चिम भागात काहीसा फटका बसल्याने त्यांना अवघ्या तीन हजाराच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. एकीकडे मतदार संघातील इतर तालुक्यात ५० हजाराहून अधिक आघाडी मिळत असताना दिंडोरीत मोदी लाट का अडखळली हे कोडे आता महायुतीच्या नेत्यांना पडले आहे. प्रचारादरम्यान खा. चव्हाण यांनी दिंडोरीत ठेवलेला अल्प संपर्क व प्रचार काळातही या भागात कमी वेळ दिल्याने काहीसा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

First Published on May 20, 2014 7:02 am

Web Title: dindori assembly constituency
Next Stories
1 आश्वासनांपेक्षा कामातूनच बोलेन..!
2 भुजबळ येवल्यात परत येतील काय?
3 महायुतीची काँग्रेस आघाडीला ‘धोबीपछाड’
Just Now!
X