News Flash

हिंगोली बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

हिंगोली बस आगारातील अनागोंदीचा पाढा राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासमोर मांडल्यानंतर रिक्त असणारे आगारप्रमुखांचे पद भरले गेले.

| May 31, 2013 01:49 am

हिंगोली बस आगारातील अनागोंदीचा पाढा राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासमोर मांडल्यानंतर रिक्त असणारे आगारप्रमुखांचे पद भरले गेले. मात्र आगारप्रमुख नांदेडवरून रोज प्रवास करून येतात. त्यामुळे त्यांचे आगारातील समस्यांकडे दुर्लक्षच होत असल्याची तक्रार केली जात आहे. आगाराच्या परिसरात अतिक्रमण कायम आहे. पाण्याचा तुटवडा असल्याने घाणीचे साम्राज्य आहे. स्वत:च बाहेरगावाहून येत असणाऱ्या अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने हिंगोली आगाराचा कारभार ढेपाळला आहे.
हिंगोली आगाराची पाहणी करण्यासाठी १६ फेब्रुवारीला जीवनराव गोरे यांनी भेट दिली होती. आगारप्रमुख नसल्याने अनागोंदी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एस. जी. सोनवणे यांची आगारप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यांच्या भेटीदरम्यान बसस्थानकाला लागून असलेल्या व्यापारी संकुलातील अतिक्रमण, आगाराची संरक्षण भिंत यावर चर्चा झाली. कंत्राटदार वेळेवर काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. संरक्षण भिंत बांधणाऱ्या कंत्राटदाराला ३० मेपर्यंत काम संपवावे, असे कळविण्यात आले होते. पण संरक्षण भिंत उभारली गेली नाही. स्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतागृहांची साफसफाईही होत नाही. परगावावरून येणाऱ्या आगारप्रमुखामुळे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे वाहक आणि चालक मर्जीनुसार काम करतात, अशा तक्रारी वाढल्या आहेत. नव्याने पाच बसगाडय़ा सुरू करण्यात आल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १ कोटी २५ लाख रुपयांचे उत्पन्न होते. ते या वर्षी १ कोटी ५५ लाख रुपये झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 1:49 am

Web Title: dirt of empire in hingoli bus stand
Next Stories
1 मराठवाडय़ात बारावीच्या निकालात पुन्हा मुलीच ‘अव्वल’
2 बारावीच्या निकालात औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर
3 लातूर विभागाचा बारावीचा निकाल ८३.५४ टक्के
Just Now!
X