सध्याची पिढी नोकरी व्यवसायानिमित्त परदेशी जाऊ लागल्यामुळे वृद्धांसोबत होणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. परदेशामध्ये वृद्धांच्या सोयीसाठी टाऊनशिपसारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यादृष्टीने एक पाऊल म्हणून शनिवार, १३ मार्च रोजी ३.३० ते ६.३० वाजता काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडय़ूजवळ ठाणे येथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  चर्चासत्रामध्ये दिशा डायरेक्टचे कार्यकारी संस्थापक संतोष नाईक, ऑयिस्टर आणि पर्ल हॉस्पिटलच्या प्रमुख अमिता फडणीस, न्यूलाइफ कस्टमचे सुभाष पटेल, गंगम ग्रुपचे संचालक अल्नेश मुखर्जी यांचा समावेश असणार आहे. नोंदणीसाठी संपर्क : ८०८०६७५००५.  http://www.nulife.net.in