News Flash

‘जि. प. पदाधिकाऱ्यांनी आता सर्वसामान्यांसाठी अधिक वेळ द्यावा’

जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीमुळे डोंगरपट्टय़ात राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्यांना पूर्ण वेळ देणे कठीण जात होते. परंतु जिल्हा परिषदेने आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची निर्मिती केल्यामुळे हे

| May 7, 2013 02:38 am

जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीमुळे डोंगरपट्टय़ात राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्यांना पूर्ण वेळ देणे कठीण जात होते. परंतु जिल्हा परिषदेने आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची निर्मिती केल्यामुळे हे लोकप्रतिनिधी नागरिकांना पूर्ण वेळ देऊ शकतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला. आता सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी अधिक वेळ द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पदाधिकारी निवासस्थान इमारतीचे उद्घाटन डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित, उपाध्यक्ष जयपालसिंग रावल, बांधकाम सभापती एस. एम. गावित उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आवारात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासाठी निवासस्थान तयार झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांना जास्त वेळ देता येईल. जिल्ह्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. तेथून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक होत असते. निवासस्थान इमारतीकडे येण्यासाठी लहान पूल व तलाव करण्यात येणार आहे. या निवासस्थानामागील भागात आंतरराष्ट्रीय क्रीडांगण तयार करण्यात येणार असून त्यालगत वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत होईल. हा संपूर्ण परिसर सुंदर व सुशोभित होणार असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायती सरपंच व नागरिक उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2013 2:38 am

Web Title: distrect parishad officers should give the time to common people
टॅग : Distrect Parishad
Next Stories
1 देशभक्तीपर आंदोलने प्रसिद्धीपुरतीच – संजय नहार
2 दारूबंदी समितीच्या अध्यक्षाला धमकविणाऱ्यांवर कारवाई
3 ‘बीएसएनएल’ विरोधात आंदोलन
Just Now!
X