कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनातील अंध, अपंग, मूकबधिर कलावंतांनी ‘स्वरानंदवन’ कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. याच कार्यक्रमात बाबा आमटे राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
हरीओम मदत केंद्रातर्फे अक्षदा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे तथा चंद्रपूर येथील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तर प्रमुख म्हणून प्राचार्य शिवाजी दळणर, डॉ. सोमनाथ रोडे, दगडू लोमटे, डॉ. हनुमंत भोसले, नरेंद्र मित्री, डॉ. पी. डब्ल्यू. िशदे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर िशगोटे, कवी इंद्रजित भालेराव, पंडित फड, डी. आर. कुलकर्णी, शिक्षक नेते सय्यद रौफ कादरी, धोंडीराम शेप यांना बाबा आमटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आनंदवनातील अंध, अपंग, मूकबधिर युवक-युवतींनी या वेळी स्वरानंदवन कार्यक्रम सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणात अंध, अपंग कलावंतांनी देशभक्तीपर गाणी सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आनंदवन गेल्या ६५ वर्षांंपासून कुष्ठरोग्यांचे दुख नाहीसे करण्यासाठी झटत आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विकास आमटे यांनी या वेळी केले. िशगोटे, भालेराव आदींनी मनोगते व्यक्त केली. हरीओम मदत केंद्राचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक, तर अॅड. सुजित आबोटी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अरुण झांबरे, भारत पवार, समर्थ अवचार, कल्याण अवचार, दिलीप जाधव आदींनी स्वागत केले. परभणीकरांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.