रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करण्यात परभणी जिल्हा आघाडीवर असून, जिल्हा सरकारी रुग्णालयात मराठवाडय़ात अग्रस्थान पटकावले, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. अमरावती जिल्हा रुग्णालयाने रक्त संकलनात पहिला क्रमांक प्राप्त केला.
रक्तदान करण्यात परभणी जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून राज्यात आघाडीवर राहिला. गतवर्षी ९ हजार ८०० पिशव्या रक्त संकलित करून परभणीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. यंदाही अवघ्या पाच महिन्यांत साडेतीन हजार पिशव्या रक्त जमा झाले. १२ हजार पिशव्या रक्त संकलित करण्याचे जिल्ह्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ बळकट होत आहे. सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. महापुरुषांच्या जयंत्या, नेत्यांचे वाढदिवस, विशेष दिन अशा कार्यक्रमांत रक्तदान शिबिरे घेण्याची परंपरा जिल्ह्यात सुरू आहे. येथील सरकारी रुग्णालयात हे रक्त संकलित केले जाते. तेथून गरजू रुग्णांना रक्ताचा पुरवठा केला जातो. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही सोय केली आहे. बाळंतीण, दारिद्रयरेषेखालील रुग्ण यांना मोफत रक्त दिले जाते.
येत्या डिसेंबपर्यंत जिल्ह्यात १२ हजार पिशव्या रक्त जमा होईल, अशी अपेक्षा येथील रक्तपेढी संकलन केंद्राचे प्रमुख डॉ. मोबिन यांनी या संदर्भात व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयात दररोज २० ते २५ रक्त पिशव्यांची गरज भासते व तेवढय़ाच जमा होतात. रक्तदान श्रेष्ठ दान हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात रक्तदान करण्यास युवकांचा पुढाकार हेच या यशामागचे कारण होय. पूर्वी परभणीला िहगोली जिल्हा जोडला होता. त्यामुळे िहगोलीतून संकलित होणारे रक्तही जिल्हा सरकारी दवाखान्यातील रक्तपेढीत समाविष्ट होत असे. सध्या परभणी सरकारी दवाखान्यातील रक्तपेढीला ‘मेट्रो ब्लड बँक’ दर्जा मिळविण्यासाठी दहा हजार पिशव्या संकलित होण्याची गरज आहे. हा दर्जा मिळाला तर ही रक्तपेढी अद्ययावत होईल, पण कर्मचाऱ्यांची संख्याही वाढणार आहे.

appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर
Jalgaon, Gold, Rs 20 Lakh, Seized, Suspicious Car, Election Security Check,
जळगाव जिल्ह्यात नाकाबंदीत काय सापडले पहा…