08 December 2019

News Flash

आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागामार्फत ‘इन्स्पायर अवार्ड’ २०१२-१३ अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, उद्या, मंगळवार ३ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे.

| September 3, 2013 09:09 am

केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागामार्फत ‘इन्स्पायर अवार्ड’ २०१२-१३ अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, उद्या, मंगळवार ३ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी शहरातील तीन शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. हुडकेश्वर येथील सेंट पॉल हायस्कूल, उच्च माध्यमिक विद्यालयात शहरातील पूर्व, दक्षिण व उत्तर भागातील माध्यमिक शाळा, नागपूर पूर्व झोन उच्च प्राथमिक शाळा, उमरेड, भिवापूर, कुही, मौदा तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग राहील.  दक्षिण अंबाझरी मार्गावरील डी.आर.ए. मुंडले शाळेत नागपूर ग्रामीण, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, नरखेड येथील शाळा, श्रीकृष्णनगरातील आदर्श संस्कार विद्यालयात कामठी, पारशिवनी, रामटेक व सावनेर  तालुक्यांतील शाळांचा सहभाग राहील. हे प्रदर्शन ५ सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले राहील.

First Published on September 3, 2013 9:09 am

Web Title: district level science exhibition starting today
Just Now!
X