राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता नववी व दहावी विषयांचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी १० ते २२ ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास सर्व माध्यमांच्या शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असल्याची माहिती प्रशिक्षण संपर्क अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी दत्तराव कदम यांनी दिली.
येथील शांतिनिकेतन महाविद्यालयात नुकतेच विभागीय प्रशिक्षण झाले. शिक्षणाधिकारी आर. बी. गिरी व संपर्क अधिकारी दत्ता कदम यांनी मुख्याध्यापकांच्या बठकीत जिल्हास्तरीय प्रशिक्षणाची माहिती दिली. जिल्हास्तरीय प्रशिक्षणात उद्या (रविवारी) इतिहास, १२ व १३ ऑगस्टला भूगोल, १४ व १६ ऑगस्टला आरोग्य व शारीरिक शिक्षण, १७ व १८ ऑगस्टला मराठी, १९-२० ऑगस्टला िहदी, २१ व २२ ऑगस्टला इंग्लिश विषयाचे इयत्ता नववी व दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण होणार आहे. या दोन वर्गाच्या सर्व शाळेतील विषय शिक्षकांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहाणे अनिवार्य आहे, अशी माहिती गिरी व कदम यांनी दिली.