04 July 2020

News Flash

दिघा-ऐरोली परिसरातील विजेचा लंपडाव संपणार

ऐरोलीतील दिघा आणि रामनगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून असणारी विजेची समस्या आता मार्गी लागली आहे.

| March 13, 2015 06:36 am

ऐरोलीतील दिघा आणि रामनगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून असणारी विजेची समस्या आता मार्गी लागली आहे. महावितरणच्या वतीने इन्फ्रा २ योजनेअंतर्गत परिसरात नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसविणे आणि विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संदीप यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
आमदार संदीप नाईक यांनी मागील वर्षभरात ऐरोली मतदारसंघात महावितरणच्या लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, तसेच ऐरोली परिसरात एमआयडीसी आणि शहरी भागांत स्वतंत्र ट्रॉन्सफार्मर बसविणे, डीपी बॉक्स बसविणे व इतर कामांसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून महावितरणने २०० कोटींची कामे सुरू केली आहेत, अशी माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली. आमदार नाईक यांच्या हस्ते रामनगर येथे इन्फ्रा २ योजनेअंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
महावितरणने नागरिकांच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या या योजनेमुळे मागील वर्षांनुवष्रे धोकादायक आणि जीवघेण्या ठरलेल्या विद्युतवाहक तारा भूमिगत होणार आहेत; तर दिघा, रामनगर, ऐरोली परिसरात सुरू असणारी लोंडशेडिंगची समस्या सुटणार आहे. आगामी कालावधीत रबाले, एमआयडीसी, गोठिवली गाव, दिवा गाव, घणसोली, कोपरखरणे, वाशी नोड येथे महावितरणच्या वतीने नवीन ट्रॉन्सफॅार्मर बसविणे आणि उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 6:36 am

Web Title: diva airoli electricity problem will solve soon
टॅग Electricity
Next Stories
1 ‘जनता दरबार’ला‘जनता सुसंवाद’ने उत्तर
2 कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी महिला दिनाची आवश्यकता नाही
3 तळे राखणाऱ्यानेच पाणी चाखले
Just Now!
X